रचना क्र. 28
श्री विश्वनाथ महाराज, डव्हा
श्री पेठेकाका
नमन श्री विश्वनाथबाबांना ।
डव्हे गावी मजुरी करताना ।
प्रिय झाला नाथनंगेबाबांना ।
शिष्य म्हणुनी आपण ॥८९॥
त्यांनी दिलेले कठोर साधन ।
चाकातीर्थी केले आचरण ।
साक्षात्कारे अवघे जीवन ।
पावन धन्य झाले ॥९०॥
अंतर्बाह्य शुद्धतेचा संदेश ।
आपण दिला साधकांस ।
गुरुनाम गाथा आम्हांस ।
आचरण्या बळ द्यावे ॥९१॥
