रचना क्र. 29
श्री निसर्गदत्त
श्री पेठेकाका
नमन श्री निसर्गदत्तांस ।
मायापुरी मुंबईत वास ।
प्रारब्धे प्रयत्ने सहवास ।
सिद्धरामेश्वरांचा घडला ॥९२॥
त्यांनी दिली ओळखण ।
स्वरूप हेचि आपण ।
श्रद्धेने तीन वर्षे आचरण ।
अखंड आपण केले ॥९३॥
गाठली तेव्हा स्वरूपस्थिती ।
मग साक्षित्वे वावरला जगती ।
सुखसंवाद दिधला हाती ।
आम्हा साधकांच्या ॥९४॥
