रचना क्र. 19
श्री तुकोबा
श्री पेठेकाका · null
null
नमन जगद्गुरू श्री तुकोबा ।
अनुभवांचा अलौकिक गाभा ।
गाथेची पसरली प्रभा ।
आज अवघ्या जगावरी ॥६२॥
पाखंड तोडून टाकिले ।
प्रेमळ भक्त प्रतिष्ठिले ।
कठोर साधन उपदेशिले ।
अनुभवशुद्ध वचनी ॥६३॥
विचार करण्या लाविले ।
भावे आकाशाएवढे केले ।
विठ्ठलाचे प्रेम वाढविले ।
ते आम्हा लाभो ॥६४॥
