रचना क्र. 18
श्री ज्ञानेश्वर
श्री पेठेकाका · null
null
नमन श्री ज्ञानराज माउली ।
संतांनाही वाटे सावली ।
भक्तांवरी सदेह कृपा झाली ।
कृष्णपरमात्म्याची ॥५९॥
भक्तिमार्ग सोपा केला ।
भगवंत सर्वांचा झाला ।
अनुपम सुबोध सजवून दिला ।
गीतार्थ मराठियांना ॥६०॥
ओवी ओवी अमृतानुभव ।
शांत करी अगणित जीव ।
कैवल्याचा द्यावा अनुभव ।
संतछायेत सर्वांना ॥६१॥
