रचना क्र. 20
श्री रमण महर्षी
श्री पेठेकाका · null
null
नमन श्री रमण महर्षींस ।
विरक्त मौनी साधूस ।
बाळपणी तपश्चर्येने स्वरूपास ।
साधले आपण ॥६५॥
खऱ्या मीचा करावा शोध ।
घेता तयाचा पूर्ण वेध ।
दु:खचिंतेचा संपतो संबंध ।
निरुपाधिक मार्ग आपुला ॥६६॥
आपुले हास्य निर्मळ ।
नि:शब्द संवाद प्रबळ ।
शुद्ध साधनविचारास बळ ।
सदैव आम्हा देतसे ॥६७॥
