रचना क्र. 10
श्री बीडकर महाराज
श्री पेठेकाका
श्री बीडकर महाराजांसी नमन ।
रामानंद नामे धन्य ।
प्रपंच परमार्थी अनन्य ।
पराक्रममूर्ती आपण ॥३५॥
श्री अक्कलकोट स्वामी प्रसन्न ।
घेतले आपण करून ।
पुढे मौलिक उद्बोधन ।
शिष्यहितासाठी केले ॥३६॥
परमार्थात नसे प्रारब्ध ।
सर्वत्र आपुला प्रयत्नवाद ।
आम्हा साधकांस आशीर्वाद।
आपुला असावा संतवर्या॥३७॥
