रचना क्र. 11
श्री भाऊसाहेब उमदीकर
श्री पेठेकाका · null
null
श्री भाऊसाहेबांस नमन ।
उमदी ग्राम केले धन्य ।
निंबरगी महाराजांस अनन्य ।
शिष्य आपण झाला ॥३८॥
भक्तीचा घालून दिला धडा ।
दासबोधाचा केला उलगडा ।
नेम, सप्ताह भरूनी घडा ।
वाहविले सर्वत्र ॥३९॥
शिष्योत्तम अंबुराव ।
आणि घडविले गुरुदेव ।
प्रयत्न आणि खरा देव ।
उपदेशिला अज्ञ जना ॥४०॥
