रचना क्र. 7
श्री रामकृष्ण परमहंस
श्री पेठेकाका · null
null
भक्तिभावे नमन श्री रामकृष्णांस ।
भूतळीच्या परमहंसास ।
निर्मळ अंतःकरण, सरळ स्वभावास ।
तसे नमन तपश्चर्येस॥२६॥
कालीमाता सजीव झाली ।
विकार आसक्ती नाश पावली ।
तंत्र शक्ती वैष्णव साधना झाली ।
सिद्ध अपुल्यापुढे ॥२७॥
सारदामाता लौकिक पत्नी ।
घडविली थोर अधिकारी साधनी ।
विवेकानंदादि शिष्यांना प्रेरणा देऊनी ।
युगधर्म प्रवर्तिला ॥२८॥
