रचना क्र. 5
प्रगतीसाठी प्रार्थना
श्री पेठे काका
(अनेकदा आपल्यासमोर दिवसाचे किंवा
करावयाच्या व्यावहारिक व पारमार्थिक
कामांचे ध्येय निश्चित नसते. ते ध्येय
यशस्वीपणे अंमलात आणण्यासाठी लागणाऱ्या
घटकांची जाणीव व अंमल होत नाही.
त्यामुळे अनेकदा अपेक्षित यश येत नाही.
त्यासाठी ही प्रार्थना नित्याने शक्यतो सकाळी
किंवा कामास बाहेर पडताना करणे उपयुक्त ठरेल.)
ध्येयास निश्चितपणा असु दे मनात ।
श्रद्धा, कृती, कुशलता, सातत्य त्यात ।
हे सर्व जाणुन मला करु दे प्रयत्ना ।
जोडोनि दोन्हि कर मी प्रार्थी गुरूंना ॥
-- श्रीराम --
