रचना क्र. 4
सायंकाळची प्रार्थना
श्री पेठेकाका
दिवसभराच्या लोकव्यवहारामुळे मनावर
अनेक योग्यअयोग्य संस्कार किंवा प्रतिक्रिया
साठत असतात. त्यात शारीरिकदृष्ट्याही
कामांच्या व्यापामुळे आपण थकून जातो व
आपल्या सकाळच्या ध्येयाचा अधिकच विसर
पडण्याची शक्यता असते. अशा वेळी ही
प्रार्थना मनोमन केल्यास ध्येयाचे मनाला
स्मरण होऊन जागेपणा येऊन आपली
प्रगतीची वाटचाल सुरू राहील. )
हा संधिकाल पसरे सर्वत्र दाट ।
श्रमलो जरी थकुन मी भवसागरात ॥
स्मरणात नित्य टिकु दे कृतनिश्चयाला ।
नामात वृत्तित तसे टिकु दे मनाला ॥
-- श्रीराम --
