रचना क्र. 6
शुद्ध ध्येय
श्री पेठेकाका
( आपण जगामध्ये नेमके कशामुळे
आलो, पुन्हापुन्हा जगात का यावे
लागते व या जन्मात तरी या फेऱ्यातून
मुक्तता व्हावी म्हणून, आपले या
जन्मीचे ध्येय काय असावे याचा बोध
व्हावा, स्मरण टिकावे व कृती व्हाव्या
यासाठी हा श्लोक उपयोगी होऊ शकेल.)
घेऊन चित्त जगती या देहि आलो ।
आधी जगून कितिदा नुसताच गेलो ॥
चित्तात पालट घडो वा नष्ट होवो ।
हे शुद्ध ध्येय धरुनी हा जन्म जावो ॥
-- श्रीराम --
