रचना क्र. 31
श्री कृष्णदासांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय देवा गुरुदेवा श्री कृष्णदासा ।
भक्तीविरक्तिसेवा अवघ्या आदर्शा ॥ जयदेव, जयदेव॥धृ॥
कोकणप्रांती शिक्षण बालवयी झाले ।
विद्यादानासाठी ग्राम त्यागीले ।
संत राजाराम सद्गुरु लाभले ।
साधन करुनी जीवन धन्य तव झाले ॥ जयदेव, जयदेव ॥१॥
विरक्त राहुनि ब्रह्मचर्य साधीले ।
‘बाळेनरनारी’ हे ‘प्रेमे’ सेवीले ।
भक्तीने निजराम प्रसन्न केले ।
चरणी ठेवा दीन भक्त आपुले ॥ जयदेव, जयदेव ॥२॥
