रचना क्र. 32
वास्तुपुरुषाची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय वास्तुपुरुषा, आरति आकाराधीशा ।
मंगलसमयी नमुनि वांछितो, तव शुभ आशीषा ॥ धृ ॥
निराकार तो ईश प्रेममय, कधि हो साकार ।
ग्रहगोलादिक पृथ्वी आम्हासाठी अवतार ।
भूमिरूप त्या भगवंताला, करू नमस्कार ।
युगेयुगे जी धारण करिते, अगणित आकार ॥ १ ॥
त्यामधली ही वास्तु आमुची, कृपा जिवांवर ।
ईशरूप त्यामधील तुम्ही, दीना आधार ।
वास्तुदेवता शक्तिरूप तव, वसो निरंतर ।
प्रसन्न राहो दिक्कालहि हे, सदा अम्हावर ॥२॥
