रचना क्र. 30
श्री स्वामी निरंजन रघुनाथ यांची आरती
श्री पेठेकाका · null
null
आरती, स्वामी निरंजन रघुनाथा ।
भावे चरणी ठेविला माथा ॥धृ॥
संसारी असता सुखदुःखा अनुभवले ।
जनस्वभाव स्वार्थी, मायेला मन विटले ।
मग दत्तदर्शना प्राणपणा लावियले ।
तुकयांना स्मरुनी प्रस्थाना ठेवियले ॥१॥
रघुनाथ सद्गुरू प्रसन्न तुम्हा झाले ।
आशीर्वच तैसे कवित्व तुम्हा दिधले ।
तुम्ही प्राण अर्पिता दत्तप्रभू प्रगटले ।
गिरनारी जीवन धन्य आपुले झाले ॥२॥
वैराग्या जपुनी शिष्यांसाठी झटले ।
अनुभवा, अभंगा, ज्ञाना अक्षर केले ।
गुरुमार्ग, भक्तिच्या विपुल प्रसादा दिधले ।
स्वामींच्या स्मरणी दीन जीव उद्धरले ॥३॥
