रचना क्र. 460
पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे
श्री तुकोबा
पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे ।
आपुलाल्या दैवे पिके भूमी ॥१॥
बीज तेचि फळ येईल शेवटी ।
लाभहानितुटी ज्याची तया ॥२॥
दीपाचिये अंगी नाही दुजाभाव ।
धनी,चोर,साव सारिखेचि ॥३॥
काउळे ढोपरा कंकर तित्तरा ।
राजहंसा चारा मुक्ताफळे ॥४॥
तुका म्हणे येथे आवडी कारण ।
पिकला नारायण जया तैसा ॥५॥
