रचना क्र. 459
ऐसा माझा कोण आहे
श्री तुकोबा
ऐसा माझा कोण आहे भीडभार ।
नावाचा मी फार वाया गेलो ॥धृ॥
काय सेवा रुजू आहे सत्ताबळ ।
ते मज राऊळ कृपा करी ॥१॥
काय याती शुद्ध आहे कुळकर्म ।
तेणे पडे वर्म तुझे ठायी ॥२॥
कोण तपोनिधी, दानधर्मशीळ ।
अंगी एक बळ आहे सत्ता ॥३॥
तुका म्हणे वाया जालो भूमी भार ।
होईल विचार काय नेणो ॥४॥
