रचना क्र. 445
अतीव दुर्लभ मानव जन्म
श्री पेठेकाका · null
null
अतीव दुर्लभ मानव जन्म ।
धन्य ज्यांसी कळले मर्म ॥१॥
पाहुनि शास्त्रांचा भावार्थ ।
कर्मे आचरती निःस्वार्थ ॥२॥
अथवा गुरुआज्ञा पाळणे ।
भावे निःसंदेह जगणे ॥३॥
ज्यांचा विवेक जागृत नित्य ।
जगणे निरहंकारी सत्य ॥४॥
शुद्ध हेतु सावध चित्त ।
शांती नांदे सुखे नित्य ॥५॥
दीन म्हणे विठ्ठलचरणी ।
सर्व अर्पुनि मुक्त प्राणी ॥६॥
