रचना क्र. 444
जिचा न कळे आदीअंत
श्री पेठेकाका · null
null
जिचा न कळे आदीअंत ।
तेचि सद्गुरुलीलामृत ॥१॥
आणी भानावरी जन ।
गेले जगात जे भ्रमून ॥२॥
कर्तव्यांची जाणीव येई ।
स्वानंदाची ओळख देई ॥३॥
आम्हा दृष्टी असुनी भ्रम ।
गुरुंचे थेट अचूक काम ॥४॥
लीला भक्तांसी अमृत ।
नीरस अभाग्यासी ठरत ॥५॥
दीन म्हणे सदगुरूमूर्ती ।
लीलामृती लागो प्रीती ॥६॥
