रचना क्र. 443
तूचि देव, गुरु सखा । जन्मोजन्मी आत्मसखा
श्री पेठेकाका
तूचि देव, गुरु सखा ।
जन्मोजन्मी आत्मसखा ॥
दोषे भरतसे अंतर ।
शुद्ध करिसी निरंतर ॥१॥
होता उद्विग्न मन फार ।
होशी विसावा, आधार ॥२॥
कधी येता सुखे, मान ।
तूचि देशी आत्मभान ॥३॥
कधी प्रपंची रमता ।
ध्येय जाग देशी चित्ता ॥४॥
होता न ये उतराई ।
याचे स्मरण नित्य देई ॥५॥
दीन म्हणे आर्त भक्त ।
ठेवि पायी करुनी मुक्त ॥६॥
