रचना क्र. 440
पहा वय, व्यर्थचि गेले रे
श्री रंगनाथ स्वामी · null
null
पहा वय, व्यर्थचि गेले रे ॥धृ॥
विषय विलासी गुंतुनि गेले ।
काय बरे हे केले रे ॥१॥
मृगमद नाभिसि असता नेणुनि ।
भ्रमता भ्रमता गेले रे ॥२॥
निजरंगे रंगेना ते हे ।
भवोेदधि बुडले रे ॥३॥
या नरदेही, श्री गुरुभजने ।
काही स्वहित करी रे ॥४॥
मग वय, सार्थचि होई रे ॥
