रचना क्र. 441
आम्हा घरी नित्य दिवाळी
श्री पेठेकाका · null
null
आम्हा घरी नित्य दिवाळी ॥धृ॥
मधूकडूचे, हवेनकोचे, उभय दीप उजळी ॥१॥
जिव्हेवरती मौन, बोलणे, मांडितसे ओळी ॥२॥
भक्तिअभक्ती, वृत्तिनिवृत्ती, मिळुनि एक टाळी ॥३॥
सगुणनिर्गुणा ऐक्य साधुनी, शांति छत्र ढाळी ॥४॥
