रचना क्र. 439
सखया स्मरण करी रे
श्री रंगनाथ स्वामी · null
null
सखया स्मरण करी रे, अंतरि भाव धरी रे ॥धृ॥
विस्मृति जिवपद त्याचे पोटी
अनंत दुःखे कोटी ।
जन्ममरणसंसरण यातना
भोगणे आटाआटी ॥१॥
स्मरणे तो शिव, विस्मृति तो जिव,
कारण भवदुःखाचे ।
शिवपद चिन्मय नित्य निरामय
शाश्वत सहज सुखाचे ॥२॥
नाहं देहो नच मे देहो,
म्हणता ब्रह्म निजांगे ।
विसर न स्मरणातीत सदोदित
सहज पूर्ण निजरंगे ॥३॥
