रचना क्र. 420
आरुष शब्द बोलो
श्री तुकोबा
आरुष शब्द बोलो मनी न धरावे काही ।
लडिवाळ बाळके तूचि आमुची आई ॥१॥
देई गे विठाबाई प्रेमभातुके ।
अवघिया कवतुके लहाना थोरा सकळा ॥२॥
असो नसो भाव आलो तुझिया ठाया ।
पाहे कृपादृष्टी आता पंढरीराया ॥३॥
तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी ।
नामे भवपाश हाते आपुलिया तोडी ॥४॥
