रचना क्र. 419
केली कटकट
श्री तुकोबा
केली कटकट गाऊ नाचो नेणता ।
लाज नाही भय आम्हा पोटाची चिंता॥१॥
बैसा सिणलेती पाय रगडू दातारा ।
जाणवू द्या वारा उब जाली शरीरा॥२॥
उशिरा उशीर किती काय म्हणावा ।
जननिये बाळका कोप काही न धरावा॥३॥
तुझिये संगती आम्ही करू कोल्हाळ ।
तुका म्हणे बाळे अवघी मिळोन गोपाळ॥४॥
