रचना क्र. 421
जननी हे जाणे
श्री तुकोबा · null
null
जननी हे जाणे बाळकाचे वर्म ।
सुख दुःख धर्म जे जे काही ॥१॥
अंधापुढे जेणे दिधला आधार ।
त्याचा हा विचार तोचि जाणे ॥२॥
शरणागता जेणे घातले पाठीशी ।
तो जाणे तेविशी राखो तया ॥३॥
कासे लागे तया न लगती सायास ।
पोहोणारा त्यास पार पावी ॥४॥
तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती ।
दिला त्याची गति तोचि जाणे ॥५॥
