रचना क्र. 414
नित्य खावे प्यावे ल्यावे
श्री पेठेकाका · null
null
नित्य खावे प्यावे ल्यावे ।
हे तो घडतसे स्वभावे ॥१॥
नाती प्रसंग हौस मौज ।
सणवार होती सहज ॥२॥
होते तेते होऊ द्यावे ।
परी अंतरि शोधित राहावे ॥३॥
अमोल मनुष्य आम्हा केले ।
ते का यासाठी विठ्ठले ॥४॥
आम्ही भगवंत शोधावा ।
शाश्वत आनंदाचा ठेवा ॥५॥
दीन म्हणे मनुष्य व्हावे ।
तरी विठ्ठल होउनि जावे ॥६॥
