रचना क्र. 413
माझा विठ्ठल आगळा
श्री पेठेकाका · null
null
माझा विठ्ठल आगळा ।
प्रेमकृपेचा जिव्हाळा ॥१॥
पाय न हालविता चाले ।
ओठ न हालविता बोले॥२॥
हात ठेवूनिया कटी ।
दुःखे हरितो प्रेमदृष्टी ॥३॥
काही न होता बोलणे ।
अंतरीचे दुःख जाणे ॥४॥
दीन म्हणे सर्वा भेटो ।
चित्ती विठ्ठल अवघा दाटो ॥५॥
