रचना क्र. 412
देवा तुझे मनोगत
श्री पेठेकाका · null
null
देवा तुझे मनोगत ।
उमटो माझे अंतरात ॥१॥
करीत आलो जे जे काही ।
देहबुद्धीने ते पाही ॥२॥
त्याने केला अवघा गुंता ।
मज येईना सोडविता ॥३॥
काही कृपा करी देवा ।
शुद्ध सरळ बुद्धी ठेवा ॥४॥
तेणे मार्ग होइल सोपा ।
प्रकाश दाविल तुमची कृपा ॥५॥
दीन म्हणे शरण आलो ।
न ये वाचे काही बोलो ॥६॥
