रचना क्र. 411
आम्हा पतीता पावन
श्री पेठेकाका · null
null
आम्हा पतीता पावन । करिसी तूचि एक धन्य ॥१॥
अवघे आवडती विकार । पदोपदी तुमचा विसर ॥२॥
नित्य करितो पोटधंदा । वाटे संकीर्तन आपदा ॥३॥
किती क्षोभाचे हे वणवे । नच वाटे तुज भेटावे ॥४॥
पोटी घालुनी अमुचे सारे । जवळ करिशी प्रेमभरे ॥५॥
दीन म्हणे कृपा स्मरू । विठ्ठल चरण हृदयी धरू ॥६॥
