रचना क्र. 410
कृपाळू हरिहरा
श्री पेठेकाका · null
null
कृपाळू हरिहरा ।
यावे आपुल्या या घरा ॥१॥
तुम्ही उदारहस्ते दिले ।
नाही सांभाळिता आले ॥२॥
नव्हती भाग्याची कल्पना ।
कृपेच्या कधी न केले मनना॥३॥
गुरुकृपे सावध केले ।
पायी देवाच्या घातले ॥४॥
नाम जागण्या हृदयात ।
आता व्हावे क्षमावंत ॥५॥
दीन म्हणे हरिहर आला ।
भाग्या पार नाही उरला ॥६॥
