रचना क्र. 409
मी माझे विसरे
श्री रंगनाथ स्वामी · null
null
मी माझे विसरे, विसरे
नाही साधन बा दुसरे, दुसरे ॥धृ॥
दुःखित जीव भ्रमे भुललाहे ।
कारण त्यासी अहंममता हे ॥१॥
यासाठी श्रुतिसंग्रहणे ।
सहकरणे मानस निग्रहणे ॥२॥
हाचि मंत्र सनकादिक गाती ।
भाविक हृत्कमलांतरि ध्याती ॥३॥
विद्वज्जनि हा हृद्गत भाव ।
हाचि पूर्ण निजरंगस्वभाव ॥४॥
