रचना क्र. 408
याचि देही याचि डोळा
श्री रंगनाथ स्वामी · null
null
याचि देही याचि डोळा, लागावे हरि पाया ।
पावुनिया नरकाया, आम्ही जाऊ का नरका या ॥धृ॥
साधुसज्जनी नवविध भजनी, लागुनिया दिनरजनी ।
सच्चित्सुखमय होउनि राहू नित्य निरंजनी ॥१॥
सत्कर्मे ब्रह्मार्पण सर्व, निरहंकृतिने करुनि ।
निजानंदघन ब्रह्म सनातन, होउ गगन भरूनि ॥२॥
दुर्लभ हा नरदेह यांतही, दुर्लभ सद्गुरु भेटे ।
सहज पूर्ण निजरंग पदी मग, ब्रह्मसमन्वय दाटे ॥३॥
