रचना क्र. 407
स्वामी वरदानंदांची आरती
श्री पेठेकाका · null
null
स्वामी वरदानंदा सच्चित्गुणकंदा ।
गुरुनिष्ठे ओवाळू अनंत आनंदा ॥धृ॥
जयदेव जयदेव..
अघटितजन्मा, कर्मा, कोठे ना उपमा ।
विद्या वैद्यक आत्मज्ञानी परिसीमा ॥१॥
जयदेव जयदेव..
जे जे सद्गुण दिधले तवरूपे देवे ।
गुरुसेवा सत्कर्मे वाटित सद्भावे ॥२॥
जयदेव जयदेव..
समाजकारण, भाषा मिति ना विषयांस ।
दाविशि ध्यासे कैसा करणे अभ्यास ॥३॥
जयदेव जयदेव..
संसारासी स्थान, परमार्था मान ।
अध्यापन, उद्बोधन, जपुनी साधन ॥४॥
जयदेव जयदेव..
पाखंडा प्रहार, भक्ता आदर ।
दीनां द्यावे अप्पा, चरणी माहेर ॥५॥
जयदेव जयदेव..
