रचना क्र. 406
देवा अपूर्व तुमचे दान
श्री पेठेकाका · null
null
देवा अपूर्व तुमचे दान ।
दिले देहाचे हे रत्न ॥१॥
त्याची द्यावी मज जाणीव ।
नित्य कृतज्ञ राहो भाव ॥२॥
त्याचे नसो मज कौतुक ।
जागा राहो हा विवेक ॥३॥
नको मनाधीन जगणे ।
साधो तुमच्या इच्छे राहाणे ॥४॥
दीन म्हणे उद्धराया ।
तुमच्या कामी झिजो काया ॥५॥
