रचना क्र. 405
एक मागणे गुरुराया
श्री पेठेकाका · null
null
एक मागणे गुरुराया ।
कर जोडोनीया पाया ॥१॥
रूप देवाचे आवडो ।
सर्वांभूती दर्शन घडो ॥२॥
त्याचे आवडो गुणगान ।
घडो नित्य संकीर्तन ॥३॥
आड तुझिया मदमत्सर ।
त्यांसी नेई पैलपार ॥४॥
तुझ्या मनी ज्यांचे आर्त ।
असे नित्य भेटो भक्त ॥५॥
जगी कार्यापुरता वास ।
बाकी लागो देवध्यास ॥६॥
राम कृष्ण विठ्ठल दत्त ।
शिव शक्ती तूचि व्यक्त ॥७॥
दीन म्हणे घडोघडी ।
वाढो नामाची आवडी ॥८॥
