रचना क्र. 400
बाहु उभारुनी दत्त गर्जतो
श्री पंत महाराज (बाळेकुंद्री) · null
null
बाहु उभारुनी दत्त गर्जतो ॥
भक्तांसी राखितो ॥धृ॥
कोणी न पाहे वक्र दृष्टीने ॥
काळ चाकर तो ॥१॥
रहा निश्चिंत नाम स्मरत ॥
तापत्रय हरितो ॥२॥
दत्तावधूत भजनी रमता ॥
प्रेमामृत पाजितो ॥३॥
