रचना क्र. 398
स्वर्गलोकीहून आले
श्री तुकोबा · null
null
स्वर्गलोकीहून आले हे अभंग ।
धाडियेले सांग तुम्हालागी ॥१२.१॥
नित्यनेमे यांसी पढता प्रतापे ।
जळतिल पापे जन्मांतरिची ॥१२.२॥
तया मागे पुढे रक्षी नारायण ।
मांडिल्या निर्वाण उडी घाली ॥१२.३॥
बुद्धीचा पालट नासेल कुमती ।
होईल सद्भक्ति येणे पंथे ॥१२.४॥
सद्भक्ति झालिया सहज साक्षात्कार ।
होईल उद्धार पूर्वजांचा ॥१२.५॥
साधतील येणे इहपर लोक ।
सत्य सत्य भाक माझी तुम्हा ॥१२.६॥
परोपकारासाठी सांगितले देवा ।
प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥१२.७॥
येणे भवव्यथा जाईल तुमची ।
सख्या विठ्ठलाची आण मज ॥१२.८॥
टाळ आणि कंथा धाडिली निशाणी ।
घ्या रे ओळखोनि सज्जन हो ॥१२.९॥
माझे दंडवत तुम्हा सर्व लोका ।
देहासहित तुका वैकुंठासी ॥१२.१०॥
