रचना क्र. 397
दुजियाला भ्रांति
श्री तुकोबा · null
null
दुजियाला भ्रांति भाविकाला शांति ।
साधूंची ती वृत्ति लीन झाली ॥११.१॥
लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले ।
जळात आटले लवण जैसे ॥११.२॥
लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी ।
येत नाही खरे त्यातुनीया ॥११.३॥
त्यासारिखे तुम्ही जाणा साधुवृत्ति ।
पुन्हा न मिळती मायाजाळ ॥११.४॥
मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना ।
सत्य सत्य जाणा तुका म्हणे ॥११.५॥
