रचना क्र. 396
गेली त्याची जाणा
श्री तुकोबा · null
null
गेली त्याची जाणा ब्रह्म तोचि झाला ।
अंतरी निवाला पूर्णपणे ॥१०.१॥
पूर्णपणे धाला राहतो कैशा रीति ।
त्याची आता स्थिती सांगतो मी ॥१०.२॥
सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत ।
राहतो मूर्खवत जगामाजी ॥१०.३॥
जगात पिशाच्च अंतरी शहाणा ।
सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो ॥१०.४॥
निमग्न तो सदा जैसा मकरंद ।
अंतर्बाह्य भेद वेगळाले ॥१०.५॥
वेगळाले भेद किती त्या असती ।
हृद्गत त्याची गती न कळे कवणा ॥१०.६॥
न कळे कवणाला त्याचे हेचि वर्म ।
योगी जाणे वर्म खूण त्याची ॥१०.७॥
खूण त्याची जाणे जे तैसे असती ।
तुका म्हणे भ्रांति दुजियाला ॥१०.८॥
