रचना क्र. 395
मायाजाळ नासे
श्री तुकोबा · null
null
मायाजाळ नासे या नामेकरूनी ।
प्रीति चक्रपाणी असो द्यावी ॥९.१॥
असो द्यावी प्रीति साधूंचे पायासी ।
कदा कीर्तनासी सोडू नये ॥९.२॥
सोडू नये पुराणश्रवण कीर्तन ।
मनन निदिध्यास साक्षात्कार ॥९.३॥
साक्षात्कार झालिया सहज समाधि ।
तुका म्हणे उपाधी गेली त्याची ॥९.४॥
