रचना क्र. 394
भूती लीन व्हावे
श्री तुकोबा · null
null
भूती लीन व्हावे सांगावे नलगेचि ।
आता अहंकाराची शांति करा ॥८.१॥
शांति करा तुम्ही ममता नसावी ।
अंतरी वसावी भूतदया ॥८.२॥
भूतदया ठेवा मग काय उणे ।
प्रथम साधन हेचि असे ॥८.३॥
असे हे साधन ज्याचे चित्ती वसे ।
मायाजाळ नासे तुका म्हणे ॥८.४॥
