रचना क्र. 393
ओळखा रे वस्तू
श्री तुकोबा · null
null
ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना ।
नका आडराना जाऊ झणी ॥७.१॥
झणी जाल कोठे बुडवाल हित ।
विचारी मनात आपुलिया ॥७.२॥
आपुलिया जिवे शिवासी पहावे ।
आत्मसुख घ्यावे वेळोवेळा ॥७.३॥
घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे ।
भूती लीन व्हावे तुका म्हणे ॥७.४॥
