रचना क्र. 392
दोष रे जातील
श्री तुकोबा · null
null
दोष रे जातील अनंत जन्मींचे ।
पाय त्या देवाचे न सोडावे ॥६.१॥
न सोडावे पाय निश्चय तो करा ।
आळवा शारंगधरा भावबळे ॥६.२॥
धरुनि केशव आणा भावबळे ।
पापिया न कळे काही केल्या ॥६.३॥
न कळे तो देव संतसंगावाचुनि ।
वासना जाळोनि शुद्ध करा ॥६.४॥
शुद्ध करा मन देहातीत व्हावे ।
वस्तूसी ओळखावे तुका म्हणे ॥६.५॥
