रचना क्र. 391
ज्याची त्याला पदवी
श्री तुकोबा · null
null
ज्याची त्याला पदवी इतरा न साजे ।
संताला उमजे आत्मसुख ॥५.१॥
आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टि ।
याविण चावटी करू नका ॥५.२॥
करू नका काही संतसंग धरा ।
पूर्वीचा जो दोरा उगवला ॥५.३॥
उगवेल प्रारब्ध संतसंगकरूनी ।
प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले ॥५.४॥
वर्णियेले एका गुणनामघोषे ।
जातील रे दोष तुका म्हणे ॥५.५॥
