रचना क्र. 390
जैसी गंगा वाहे
श्री तुकोबा · null
null
जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन ।
भगवंत जाण त्याचे जवळी ॥४.१॥
त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा ।
स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥४.२॥
तया दिसे रूप अंगुष्ठप्रमाण ।
अनुभवी खूण जाणती हे ॥४.३॥
जाणती हे खूण स्वात्मानुभवी ।
तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥४.४॥
