रचना क्र. 389
उद्धरिले कूळ
श्री तुकोबा · null
null
उद्धरिले कूळ आपण तरला ।
तोचि एक झाला त्रैलोक्यात ॥३.१॥
त्रैलोक्यात झाले द्वैतचि निमाले ।
ऐसे साधियेले साधन बरवे ॥३.२॥
बरवे साधन सुखशांति मना ।
क्रोध नाही जाणा तिळभरी ॥३.३॥
तिळभरी नाही चित्तासी तो मळ ।
तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥३.४॥
