रचना क्र. 388
अहर्निशी सदा
श्री तुकोबा · null
null
अहर्निशी सदा परमार्थ करावा ।
पाय न ठेवावा आडमार्गी ॥२.१॥
आडमार्गी कोणी जन जे जातील ।
त्यातुनी काढील तोचि ज्ञानी ॥२.२॥
तोचि ज्ञानी खरा तारी दुजियांसी ।
वेळोवेळा त्यासी शरण जावे ॥२.३॥
आपण तरेल नव्हे ते नवल ।
कुळे उद्धरील सर्वांची तो ॥२.४॥
शरण गेलियाने काय होते फळ ।
तुका म्हणे कूळ उद्धरीले ॥२.५॥
