रचना क्र. 387
जन्माचे ते मूळ
श्री तुकोबा · null
null
जन्माचे ते मूळ पाहिले शोधून ।
दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥१.१॥
पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी ।
नरदेहा येउनी हानी केली ॥१.२॥
रजतमसत्त्व आहे ज्याचे अंगी ।
याच गुणे जगी वाया गेला ॥१.३॥
तम म्हणजे काय नरकचि केवळ ।
रज तो सबळ मायाजाळ ॥१.४॥
तुका म्हणे ऐका सत्त्वाचे सामर्थ्य ।
करा परमार्थ अहनिर्शी ॥१.५॥
