रचना क्र. 386
मागे कैसे भक्त तारिले
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
मागे कैसे भक्त तारिले ।
माझे वेळी काय झाले ॥धृ॥
काय अपराध माझे शिरी ।
मज मोकलीले हरी ॥१॥
शरण रिघालो मी तूज ।
कोठे राहिली पातके ॥२॥
सांग सांग पंढरिनाथा ।
भांडावया आलो आता ॥३॥
दास म्हणे मी लेकरू ।
नको माते, हयगय करू ॥४॥
