रचना क्र. 385
भावे प्रदक्षिणा घातल्या
श्री पेठेकाका · null
null
भावे प्रदक्षिणा घातल्या ।
प्रेमळ संतांना पावल्या ॥१॥
त्यांच्या सत्ते अवघे चाले ।
हेही कृपे कळो आले ॥२॥
नसता शक्तीबुद्धीप्रेम ।
आमुचे सांभाळिले नाम ॥३॥
दक्षिणभागी नित्य संत ।
मन त्यांचे हो अंकित ॥४॥
त्यांचे हिताचे बोलणे ।
मने सदैव ध्यानी धरणे ॥५॥
आता जोडियेले हात ।
माथी राहो वरदहस्त ॥६॥
दीन म्हणे फळा आली ।
पुण्ये पावलोपावली ॥७॥
